Tuch Tujhi Sobati Poetic Song.

Sonali Kulkarni’s poetry racital was composed by Sagar Patil. Tuch Tujhi Sobati is a beautiful Marathi song. You may try to achieve a desire and success in life.

Tuch Tujhi Sobati Lyric.

कुठल्याश्या वळणावरी असेल गाव ओळखीचे ll 2 ll
नको घाबरु वळणांना आहे ते तुझ्या सोबतीचे..

उघडूनी डोळे बघ मिळतील साथीदार ll 2 ll
दाखवतील ते वाट तू चाल बिनधास्त..

दूर दूर वाट जाते डोंगराच्या मिठीतूनी ll 2 ll
पलीकडे उभा असेल तुझ्या यशाचा पक्षी..

कोरडा उभा हा उंच भेगा त्याच्या अंतरी ll 2 ll
उमटती त्याच रेषा तुझ्या तळहातावरी..

खडकाची ही वाट लागेल तुला ठेच ll 2 ll
चालावे लागेल तुला तुझे ध्येय हेच..

कधी मध्यानीचा सूर्य जीव होईल व्याकुळ ll 2 ll
पाणी झिरपता गाली बघ येईल बहर..

डोकावतो संधिप्रकाश ह्या उंच पहाडातूनी ll 2 ll
ह्या एकट्या प्रवासात तूच तुझी सोबती..

हो जराशी बेफिकीर घे थोडी मजा लुटून ll 2 ll
थोडासा वेडा चाळा हीच जिंदगी ची धून..

चढायचे आहेच मोठे मोठे डोंगर ll 2 ll
छोटे छोटे पाऊल टाक अगदी होऊन निडर..

दूर ठेव दृष्टी डोंगर रांगातून पार ll 2 ll
चालायचे आहे मैलं थकून नाही चालणार..

मनाच्या खोल डोहात जरी वादळे अनंत ll 2 ll
तरी उभा हा निष्चल सर्व भार पेलवित…

मग हरायचे नाही बांध निष्चयाची गाठ ll 2 ll
घे नकांशे हाती शोध तुझी तूच वाट..

जेव्हा दिसेल शिखर सुख होईल अनावर ll 2 ll
घेता कवेत आकाश होईल जग जिंकल्याचा भास..

ह्या एकट्या प्रवासात, तूच तुझी सोबती
तूच तुझी सोबती..

Sonalee Kulkarni is a Marathi actress in India. She also work in Marathi and Hindi Films.

This is one of best lyric of Sonalee Kulkarni in 2021.

Get 30% off your first purchase

X